शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषीकेश संजोग वाघेरे (पाटील) तसेच साहूल उर्फ हमीद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सावली निवारा केंद्र, लाल बहादूर शास्त्री बँक, पिंपरी ब्रीज जवळ, पिंपरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच सावली निवारा केंद्रातील निराधार व गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण मंडळ सभापती फझलभाई शेख, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, व्यवस्थापन सेल अध्यक्ष शक्रुल्लाभाई पठाण, सावली निवारा केंद्राचे संचालक हुसेनभाई , अशपाक शेख आणि मित्र परिवार मोठमोठ्या संख्येने उपस्थित होते
Advertisement