तृतीयपंथीय आपल्या सोसायटी चा भाग आहेत व त्यांनाही मानाचा दर्जा मिळणे आवश्यक – डॉ.कुणाल देशमुख
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी येथील डॉक्टर कुणाल देशमुख यांच्या डेंटल क्लिनिक च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरां सोबतच तृतीयपंथीय असलेल्या शिव लक्ष्मी आईसाहेब व त्यांचे पती संजय झालटे यांनाही मानाने निमंत्रित करण्यात आले होते या त्यांच्या क्लिनिकच्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर कुणाल देशमुख यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की या क्लिनिक द्वारे अनेक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उपचार दिले जातात उत्तम दर्जाचे उपचार येथे केले जातात असे सांगतानाच जसे पुरुष व स्त्री ला दर्जा दिला जातो तसेच तृतीयपंथी आपल्या सोसायटीचा भाग आहेत आपण त्यांनाही त्याच प्रकारचा मानाचा दर्जा दिला पाहिजे असे वक्तव्य यावेळी डॉक्टर कुणाल देशमुख यांनी केले यावेळी शिवसेना चिंचवड विधानसभा युती सेना प्रमुख शर्वरी गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासह सर्व आदरणीय डॉक्टर्स विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
येवला तालुक्यातील संजय झालटे यांनी तृतीय पंथीय असलेल्या शिवलक्ष्मी सोबत विवाह केल्याने ते राज्यभरात सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचा सन्मान डॉक्टर कुणाल देशमुख व शर्वरी गावंडे यांनी या वेळी केला