शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड मध्ये सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे आमची सूत्रे येरवडा जेल मधून हलतात असे सांगून हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित भाई ला जेरबंद करण्यात आले आहे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने बुधवारी ही कारवाई केली मयुर अनिल सरोदे उर्फ यमभाई वय 21 राहणार दुर्गा नगर, निगडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा यापूर्वी आरोपीच्या विरोधात दाखल आहे हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकल्या होत्या याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या सोशल मीडियावरील भाईला अटक केली आहे
Advertisement