उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ दादा फाउंडेशन सौजन्याने सौ प्राजक्ता ताई वाघेश कांबळे यांनी दापोली परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
रविवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी ३ पर्यंत सदर शिबिर नगरसेवक राजू बनसोडे यांचे जनसंपर्क कार्यालय शेजारी दापोडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मधुमेह, रक्तदाब, वजन व उंची, सांधेदुखी, पाठ दुखी, गुडघेदुखी इत्यादींवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यास एक लाख रुपये पर्यंतचा अपघाती मोफत विमा देण्यात येणार आहे. तरी सदर शिबिरात युवक, युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राजक्ता ताई वाघेश कांबळे यांनी केले आहे.