शबनम न्युज / पिंपरी
महापालिकेकडून शहरात पे अँड पार्क पॉलिसी लागू करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे पिंपरीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुरुवारी आंदोलकांनी धडक देत निदर्शने केली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करून पे अँड पार्किंग या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलवर भीक मांगो आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी थेट महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत निदर्शने केली.
वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, संजीवन कांबळे, महा सचिव राजन नायर, राहुल सोनवणे, प्रवक्ता के डी वाघमारे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, कचरू ओव्हाळ, किरण हिंगणे, दशरथ शिंदे, असंघटित कामगार आघाडीचे दिनकर ओव्हाळ, सचिव राहुल बनसोडे, इमाम शेख, राजू चांदणे, राजेंद्र साळवे,अप्पू शिवशरण, बाळासाहेब शिवशरण, विनोद बांगर, माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, संतोष जोगदंड, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा शारदा बनसोडे, अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, विशाल नगर शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे, विठ्ठल नगरचे अमोल माने, घरकुल शाखेचे विजय गेडाम, शशिकुमार टोपे उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र तायडे म्हणाले, पे अँड पार्क पॉलिसी रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले होते.