शबनम न्युज / पुणे
विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म लवकरात लवकर दाखल करण्यात यावे, अशी विनंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवा सेना सचिव निखिल येवले यांनी मॉर्डन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टुडिओ निगडी पुणे येथील प्राचार्य यांना केली आहे.
सदर विनंती पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजची संपूर्ण फी भरली नाही. ज्या विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा फॉर्म आपण अजून दाखल केले नाही. अशी तक्रार युवा सेनेकडे प्राप्त झाली आहे.
सध्या कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे फी साठी अडवणूक करून कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याची आपण काळजी घ्यावी, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. असे विद्यार्थी परीक्षेदरम्यान अथवा निकालापूर्वी आपले संपूर्ण फी भरतील. त्यासाठी त्यांना सवलत देण्यात यावी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील फी च्या कारणावरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म थांबू नये, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म थांबविण्याची आपली कृती बेकायदेशीर आहे.
आपण सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म आजच भरून घ्यावेत, अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन पुणे कॉलेज समोर करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. असेही दिलेल्या विनंती पत्रात निखिल येवले यांनी म्हटले आहे.