शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 30 मध्ये डेंगू ,मलेरिया, चिकनगुनिया बाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी तालीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय वाजे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात अक्षय वाजे यांनी नमूद केले आहे की सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे या मुळे ताप येणे, डोके दुखणे, डेंगू, मलेरिया सारख्या साथीचा आजार फ़ैलावत आहे , प्रभाग क्रमांक तीस फुगेवाडी, दापोडी ,कासारवाडी ,येथून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले आहे महापालिकेच्यावतीने धूर फवारणी, औषध फवारणी असे उपाय योजना होताना दिसत नाही तसेच प्रभागात नाले, कचरा प्लास्टिक यामुळे तुंबत आहेत अशा परिस्थितीमध्ये नागरिकां च्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी अक्षय वाजे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे