शबनम न्यूज / पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. या वेळी .सदानंद शेट्टी यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले . त्यांच्या प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असून येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याच्या दिशेने जोमाने काम करू असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर मा.अंकुश (आण्णा) काकडे उपस्थित होते.
Advertisement