शबनम न्यूज / वडगाव मावळ
वडगाव मावळ | प्रतिनिधी
घोणशेत येथील सरपंच अंकुश दादू खरमारे यांची ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य मावळ तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे यांच्या मार्गदर्शन खाली पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार . ग्रामसंवाद महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका शेळके यांच्या सूचनेनुसार सरपंच अंकुश खरमारे यांची तालुका अध्यक्ष पदी ऑनलाईन निवड करण्यात आली.
Advertisement
त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ग्रामसंवाद सरपंच संघ, महाराष्ट्र भर प्रत्येक सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांना त्याचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा मुख्य उद्देश या ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा आहे.असे यावेळी अंकुश खरमारे यांनी सांगितले.