शबनम न्यूज / पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष मा नगरसेवक अॅड गोरक्षभाऊ लोखंडे यांच्या संकल्पनेतून व लिगल सेल उपाध्यक्ष मा, अॅड, विशाल जाधव,लिगल सेल टिमच्यावतीने आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा, नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवाडी कोर्ट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी महापौर ,संजोग वाघेरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष मा, जगदीशभाई शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला बचतगट महासंघाच्या अध्यक्षा-कविताताई खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष मा, अकबरभाई मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल शहराध्यक्ष मा, किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सचिनभाऊ सकाटे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल पदाधिकारी उपस्थित होते.