आमदार निधी कामांचा दापोडीमधुन शुभारंभ
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार निधीतून दापोडी व फुगेवाडी परिसरातील गणेश गार्डन , गणेश हाईट्स , सुखवानी वूड्स या हौसिंग सोसायटी परिसरात विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला, आमदार बनसोडे यांनी यापूर्वीच त्यांच्या स्थानिक विकास निधी अर्थात आमदार निधीमधून वाय. सी . एम . रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी १ कोटी व कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना पी. पी. ई . किट साठी ४५ लक्ष निधी दिलेला होता .
दापोडी फुगेवाडी हौसिंग सोसायटी मधील नागरिकांनी परिसरातील अडचणी संबधी आमदार बनसोडे यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले होते . त्याची तात्काळ दखल घेत आमदारांनी निवारण केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले . आमच्या सोसायटीचे काम मार्गी लागले असून आमची अडचण आमदारांनी दूर केली आहे , आमच्या मागणीची दखल घेत काम पार पाडले त्या बद्दल आम्ही आमदारांचे आभार मानत आहोत , असे मत गणेश हौसिंग सोसायटीचे चेअरमन श्री रामुताज प्रजापती यांनी व्यक्त केले .
स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी असून कोरोना मुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे , अनेक जन आपले काम घरातुन (Work From Home ) करत आहेत . त्यासाठी वीजपुरवठ्या संबधी अनेक समस्या आहेत , याबाबत लवकरच दापोडी, फुगेवाडी परिसरात आढावा बैठक घेण्यात येईल असे बनसोडे यांनी सांगितले . पुढील काळात प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन नागरिकांच्या अडचणी समजावून घेणार आहे , व त्या अडचणी सोडवण्यासाठी योजनाबद्द कार्यक्रम आखला जाईल असे आमदार बनसोडे यांनी सांगितले .
या प्रसंगी नगरसेवक रोहित अप्पा काटे , नगरसेविका माई काटे , नगरसेवक राजभाऊ बनसोडे , युवा नेते सिद्धार्थ बनसोडे , सनी ओव्हाळ , कार्यकर्ते व सोसायटी मधील पदाधिकारी व रहिवासी आदी मान्यवर उपस्थित होते .