शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात जंबो कोवीड सेंटर मध्ये काम करत असलेल्या डॉक्टर, परिचारिका , बॅक ऑफिस स्टाफ आणि बाऊंसर यांचा कोविड योद्धा म्हणून राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील असेल म्हणाले की तुमच्या सर्वांमुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. कोरोना म्हंटले की डॉक्टर आणि रुग्ण डोळ्यासमोर येतात पण बाउन्सर , सफाई कर्मचारी , स्टोअर किपर , कंपाऊंडर या सर्वांनी आपले जीव धोक्यात घालून पिंपरी चिंचवडकरांना सेवा दिली आहे. म्हणूनच हा सन्मान करून आम्ही आपले आभार मानत आहे.
यावेळी जंबो कोविड सेंटरच्या प्रमुख व्यवस्थापिका प्रीती व्हिक्टर यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शक्रुल्ला पठाण, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कार्याध्यक्ष युनूस शेख , उपाध्यक्ष ऋषी आचार्य आणि पिंपरी मतदार संघाचे सरचिटणीस चेतन कोठारी उपस्थित होते.