शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील चापेकर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी , अर्बन स्ट्रीट डिझाईन मधे योग्य ते बदल व सुधारणा करावी अशी मागणी भाजप नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे कि सध्या अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार चिंचवडगावातील चापेकर चौकात सुशोभिकरणासाठी रस्त्यात पोती टाकून आखणी करण्यात आली आहे व यामुळे चौकात वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.
या संदर्भात स्थापत्यचे प्रशांत पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की आम्ही सध्या ट्रायल घेत आहोत !
क्रां.चापेकर बंधुंचे चापेकर चौकात सामुहिक शिल्प आहे यामुळे चौकास विशेष ऐतेहासिक महत्व आहे त्यामुळे सुशोभिकरण करण्यासाठी आमची बिलकुल हरकत नाहीये ! पण काही सुधारणा व बदल करणे आवश्यक आहे.
1) चापेकर चौकातील वाहतूक कोंडी नाही तर सुटसुटीत होईल याची दक्षता घेऊन डिझाईन करावे.
2) चापेकर चौकातील रस्ते मोठे प्रशस्त व रुंद करावेत.
3) चापेकर चौकातील उड्डानखालिल वाहन पार्किंग व्यवस्था निटनेटकी, व्यवस्थित व जोपर्यंत चिंचवड गावठाणातील विकास कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत ती ‘मोफत’ करावी.
4) चापेकर चौकातील रिक्षा वाहन स्थळे पाहणी करून पक्की करावीत.
5) चापेकर चौकातील अधिकृत परवानाधारक हातगाड्यांची जागा निश्चित करावी व अनाधिकृत हातगाड्यांवर करावी.
6) जेष्ठ नागरिक व सर्व सामान्य नागरिकांना चालता यावे याकरिता जास्त रुंद नकोत पण व्यवस्थित फूटपाथ करावेत.
7) चापेकर चौकात अद्यावत अशी सी.सी.टि.व्ही. यंत्रणा उभी करावी.
या मागण्यांची गंभीरपणे दखल घ्यावी व त्वरित कारवाई करावी.असे नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी म्हंटले आहे.