शबनम न्यूज | निगडी
प्राधिकरण सेक्टर क्रमांक 25 येथे भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
त्याप्रसंगी सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, राजेश पिल्ले, बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुप मोरे, विजय शिनकर,माजी नगरसेवक शांताराम भालेकर, स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, सुनील कदम, पांडुरंग साने, सचिन बनसोडे उपस्थित होते.
यावेळी महेश लांडगे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या जनसंपर्क कार्यालयात आणाव्या, आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असेही यावेळी आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
Advertisement