शबनम न्यूज | पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि फुरसुंगीचे उपसरपंच संजय हरपळे यांच्या वाढदिवसानिमित्त ढमाळवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम न घेता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी सातत्याने रक्तदान शिबीरे घेण्यात येत आहेत. फुरसुंगीचे उपसरपंच संजयभाऊ हरपळे यांनी हे शिबीर आयोजित करून उत्तम उदाहरण दिले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भविष्यातही त्यांच्या कडून सामाजिक उपक्रम राबविले जातील याची मला खात्री आहे. असे यावेळी आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक मारुतीआबा तुपे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, मा.उपसभापती दिनकर हरपळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्ती बांदल, राहुल चोरघडे, सुहास खुटवड, प्रकाश हरपळे, अमोल हरपळे, अमित हरपळे, भाऊसाहेब ढमाळ, अजिंक्य ढमाळ ऍड.अमोल कापरे, निलेश घुले, संजय गायकवाड, रमेश निवांगुणे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.