शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | बातमीदार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री .अजितदादा पवार याच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत दिलीप सपकाळ (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिपरी चिचवड शहर) व प्रशांतभाऊ सपकाळ युवा मंच , धर्मवीर प्रतिष्ठान याच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक २३ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे;दिनांक २२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रा.सुर्यकांत पाटील याचा मोफत जुम आनलाइन यशस्वी पालकत्व सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक २६ रोजी वार सोमवार सकाळी ११ वाजता प्रशात सपकाळ जनसंपर्क कार्यालय,कैलास नगर थेरगाव येथे आरोग्य कर्मचारी ,ज्येष्ठ नागरिक व फिरते भाजी विक्रेते यांना छत्री वाटप करण्यात येणार आहे.कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना अजित कोविड योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच परिसरांत वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत रोपे वाटप करण्यात येणार आहे.