शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | बातमीदार
पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आंबेडकर कॉलनी, बौद्ध नगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते, अक्षय माच्छरे (सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी चिंचवड) हे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत,या नागरिकांना दिलासा देत, काळजी न करण्याचे आवाहन त्यांनी प्रथमतः केले नागरिकांच्या या येणाऱ्या अडचणींची माहिती घेताच त्यांनी महानगर पालिकेच्या संबंधित विभागाला त्वरित कळविले व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले तसेच त्यांनी योग्य त्या सूचना देऊन नागरिकांना सुरक्षित कसे राहतील याबाबतचे योग्य ते नियोजन करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत प्रतिक जम, रोहन म्हस्के, जय चव्हाण, ओमकार खैरमोडे, सुजल कांबळे, अमोल भाट हे युवा कार्यकर्ते होते.