शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते व सामाजिक कार्यकर्त्या प्रिया प्रसाद कोलते यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
या उपक्रमा अंतर्गत प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना सोबतच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रसाद कोलते यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोना सारख्या घातक विषाणूशी आपण लढा देत आहोत .आरोग्याच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार उदाहरणार्थ सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप असे आजार उद्भवत असतात. अशा आजारांपासून व पावसापासून बचाव होण्यासाठी छत्री हे एक उपयुक्त साधन आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविताना अतिशय आनंद होत आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांसाठी आपण सदैव तत्पर आहोत. या प्रभागातील नागरिकांच्या काही अडीअडचणी असो, आपण त्या अडचणी सोडविण्याचे आपले कर्तव्य समजतो. असेही यावेळी प्रसाद कोलते यांनी म्हटले.
सदर छत्री वाटपाचा कार्यक्रम हा 25 जुलै रोजी प्रसाद कोलते यांचे जनसंपर्क कार्यालय यमुनानगर निगडी येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसाद कोलते व प्रिया प्रसाद कोलते यांनी केले आहे.