विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
– नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने भजनी मंडळाना साहित्य वाटप
पिंपरी | प्रतिनिधी
भारतीय परंपरेमध्ये संत परंपरेला मोठे अनुष्ठान आहे. संतांनी भजन, कीर्तन आणि विविध लोककलांच्या माध्यमातून नागरिकांना ईश्वराशी एकरूप केले. नागरिकांना मानसिक आधार मिळवून दिला आहे. त्यामुळे ही सेवा सादर करणारी मंडळीदेखील एका अर्थाने लोकसेवकच आहेत, असे गौरवोद्गार भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी काढले.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दत्तनगर परिसरातील श्री. दत्त महिला भजनी मंडळ यांना नगरसेविका अनुराधा गोरखे व भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वतीने भजन साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, भजनी मंडळ एका अर्थाने लोकसेवेचे काम करीत आहे. भारतीय परंपरेला संत परंपरेचे मोठे अनुष्ठान लाभलेले आहे. संतांनी भजन, किर्तन, ओवी या माध्यमातून ईश्वराशी एकरूपता साधण्याचा अगदी सोपा मार्ग मिळवून दिला. भजन-कीर्तनाची ही परंपरा विविध मंडळे, कीर्तनकार, भजन सादर करणारे अशा मंडळींनी अजूनही जपली आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी एक प्रकारे लोकसेवक आहेत.
या लोकसेवक मंडळींचा गौरव करून गोरखे परिवाराच्या वतीने चांगले काम केले आहे असेही आमदार लांडगे यांनी नमूद केले.
यावेळी माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष सुभाष सरोदे ,भाजपा स्वीकृत नगरसेवक सुनील कदम , शुभांगी कसबे, निर्मला अलंकार, यशवंत दनाने,नेताजी शिंदे, विजय वाघमारे, अजिंक्य गोळे, विठ्ठल शिंदे,तानाजी साठे,सुनील शेलार, रोहन खुडे,भानुदास नेटके,प्रशांत शिंदे,अमोल कुचेकर,मनोज कसबे ,राजू विटकर,गणेश लोंढे उपस्थित होते.
तान्हाजी साठे यांनी सूत्रसंचालन केले,अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले, नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आभार मानले.