शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष एजाज चौधरी यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. असे म्हटले जाते. आज कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले.पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक गरजू, गरीब व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले. अशा नागरिकांना यानिमित्ताने एक वेळचे जेवण देता आले याचे मनात समाधान. असल्याचे यावेळी एजाज चौधरी यांनी सांगितले.
एजाज चौधरी यांनी या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी गरजू , मदत मिळालेल्या नागरिकांनी एजाज चौधरी यांचे आभार मानले.