शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोनिपु विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत असुन या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणेसाठी अंतिम मुदत दि.३० जुलै २०२१ रोजी साय.५ वा. पर्यंत असुन कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यास सदर लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतुन रद्द करण्यात येईल. तरी या योजनेत निवड झालेल्या व अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र सादर करावीत असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
सदर योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी रावेत येथे ९३४, बोऱ्हाडेवाडी येथे १२८८, चऱ्होली येथे १४४२ असे एकुण ३६६४ सदनिका वाटप करणेसाठी योजना राबविणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या परंतु कागदपत्रे सादर करणे करीता उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर लावणेत आली असुन महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर ( www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php ) देखील सदर यादी प्रसिध्द करणेत आली आहे. तरी, या योजनेत निवड झालेल्या व अद्याप पर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा वतीने करण्यात आले आहे.