शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व नागरिकांनासाठी विनामूल्य वक्तृत्व,भाषण प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत.हे वर्ग हरिष मोरे सर यांच्या प्रशिक्षकतेखाली घेण्यात येत आहे.(महिला शहराध्यक्ष रा.काँ.पा.पिं.चिं.शहर) वैशाली ताई काळभोर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी (नगरसेविका पिं.चिं.मनपा) सुमनताई पवळे, (अध्यक्ष भोसरी विधानसभा)मनीषाताई गटकळ,(कार्याध्यक्ष भोसरी विधानसभा)संगीताताई आहेर,(चिंचवड विधानसभा अध्यक्ष)संगीताताई कोकणे,(उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर) ज्योतीताई गोफणे,(चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष) स्वप्नाली ताई असवले,(पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष)सौ.आशाताई मराठे,(प्रभाग अध्यक्ष)संगीताताई जाधव,लताताई सोनवणे,(महिला भोसरी विधानसभा उपाध्यक्ष)सौ.नलीनीताई साळी,(महिला प्रभाग सरचिटणीस) सुरेखाताई फड,(महिला प्रभाग सरचिटणीस)सौ.शकुंतलाताई दहातोंडे,(महिला वॉर्ड अध्यक्ष) पूजाताई गरड,(महिला वॉर्ड सरचिटणीस) जयाताई वाघमारे,सौ.सारिकाताई कोलते,(सामाजिक कार्यकर्त्या) प्रिया ताई कोलते,(उपाध्यक्ष रा. यु.काँ.पिं.चिं.शहर जिल्हा)प्रसाद दादा कोलते व प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर वर्ग पुढील तीन महिने दर गुरुवारी सावित्रीबाई फुले सभागृह, यमुनानगर येथे दुपारी १ ते ४ यावेळेत चालविण्यात येतील. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक (उपाध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिं.शहर जिल्हा)प्रसाद गणपत कोलते व (सामाजिक कार्यकर्त्या)प्रिया प्रसाद कोलते यांनी दिली.