युवा सेना शहर प्रमुख विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पिंपरी युवा सेनेच्या वतीने सलून धारकांना आर्थिक मदत
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” या कार्यक्रमाच्या सप्ताहाचे उद्घाटन युवा सेना शहर प्रमुख विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून करण्यात आले .
कोरोना काळाच्या महामारी मुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले आहे. यामध्ये सलून उद्योगाचा मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे. आज पिंपरी युवा सेनेच्या वतीने फुगेवाडी दापोडी मधील सर्व सलून धारकांना आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी सुनील ओव्हाळ, रामभाऊ शिंगोटे, अविनाश जाधव, मॉरीस डेव्हिड,मनोज काची, चिंचआप्पा नींगडोळे, शिवा काची, सचिन नहार, उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.