साईनाथ सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून पूरग्रस्तांना होत आहेत मदत
वस्तू स्वरूपातच मदत करावी -नगरसेवक वसंत बोराटे
30 जुलै रोजी सकाळी सात वाजता निघणार पहिला मदतीचा ट्रक
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पावसामुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले पुरामुळे खेड, चीपळून, महाड या तीन तालुक्यातील गावांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील साईनाथ सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी पुढे करण्यात आला आहे, एक मदत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, एक मदत माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी, नाते माणूसकीचे असे सांगत वस्तू स्वरूपातील मदतीसाठी नगरसेवक वसंत बोराटे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूरांना आवाहन केले आहे.
वस्तू स्वरूपात मदत करावी असे अहवाना द्वारे सांगण्यात आले आहे. दिनांक 24 ते 29 जुलै दरम्यान आपण आपली मदत जमा करावी तसेच मदत ही किराणा कीट, पिण्याचे पाणी, ब्लॅंकेट अशी वस्तू स्वरुपातच असावी तसेच आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.
वस्तू स्वरूपातील मदतीसाठी 80 54 40 99 99 तसेच 80 54 50 99 99 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच मदतीसाठी ची पहिली ट्रक 30 जुलै रोजी सकाळी सात वाजता नगरसेवक वसंत बोराटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथून निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.