शबनम न्यूज | शिरूर
जुन्नर | बातमीदार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत जुन्नर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
शिवसंपर्क अभियानाच्या समारोप प्रसंगी गुरूवारी जुन्नर शहर संपर्क कार्यालयात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते यावेळी जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, संभाजी तांबे, शरद चौधरी ,जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शहरप्रमुख चंद्रकांत दोके, मंगेश काकडे, अविनाश कर्डिले ,नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश पर्देशी ,गणेश कवडे ,महेश शेळके, विशाल परदेशी, समीर भगत, कविता गुंजाळ ,अंकिता गोसावी, श्याम खोत, माऊली, विनायक गोसावी ,विकी पारखे, सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते