शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 17 लाख 46 हजार 199 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 27 हजार 138 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 335 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.57 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 77 हजार 963 रुग्णांपैकी 10 लाख 49 हजार 763 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 64 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.38 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 13 हजार 372 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 616 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 620 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 73 हजार 219 रुग्णांपैकी 1 लाख 65 हजार 278 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 426 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 69 हजार 784 रुग्णांपैकी 1 लाख 55 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 341 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 92 हजार 800 रुग्णांपैकी 1 लाख 75 हजार 597 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 884 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 63 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 921, सातारा जिल्ह्यात 937, सोलापूर जिल्ह्यात 383, सांगली जिल्ह्यात 858 तर कोल्हापूर जिल्ह्यात 964 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 797 आहे. पुणे जिल्हयामध्ये 857, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 803, सोलापूर जिल्हयामध्ये 472, सांगली जिल्हयामध्ये 981 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 684 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 24 लाख 813 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 27 हजार 138 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.