शबनम न्युज | चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रक्कम असा एकूण साडे 38 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडी ची पहिली घटना चिंचवड येथील शामा हेरिटेज या सोसायटीमध्ये 21 ते 23 जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी सुदाम भालेराव (वय 23 ) राहणार श्यामा हेरिटेज चिंचवड यांनी शनिवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या आई-वडिलांसह नाशिक येथे लग्नसमारंभासाठी गेले होते त्यावेळी त्यांचा फ्लॅट बंद होता. 21 ते 23 जुलै या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली 4 हजार रुपये रोख व अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण साडेसहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, फिर्यादी यांच्या मजल्यावर राहणाऱ्या शांती वर्मा यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी केली.
घरफोडीच्या दुसऱ्या घटनेबाबत मेहबूब मयखतूनसाहब गुब्याड (वय 22 ) रा. मोर्या सोसायटी चिंचवड यांनी शनिवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुब्याड यांचा मोठा भाऊ फ्लॅटला कुलूप लावून गोवा येथे गेला होता.