शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २३, थेरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांच्या वतीने महापालिकेतील आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, महापालिका हॉस्पिटल मधील वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टर, नर्स, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना छत्री वाटप व कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक नानासाहेब काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पवार, स्वि.नगरसेवक गोरक्षनाथ पाषानकर, संजय गांधी समिती मा.अध्यक्ष शशिकलाताई सपकाळ, सुनिताताई फुले, महेश गवारे, विशाल बारणे, युनुस पठाण,नुर खान, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, बाळासाहेब पवार, प्रशांत पवार, अविनाश घोगरे, रवि मल, दिपक तरडे व सिटी हॉस्पिटलचे डॅा.जावेद शेख, डॅा.आबासाहेब बोराडे, पत्रकार शबनम सय्यद तसेच ज्येष्ठ नागरिक महादेव राऊत, सुरेंद्र पारख, नथुराम खोकर, आदिनाथ मारकड, किसनराव शिंदे, शंकर ओव्हाळ,गोकुळ सपकाळ व धर्मवीर प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी, इतर नागरिक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश रेनवा यांनी केले.