शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २५ जुलै रोजी प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व ज्येष्ठ नागरिक,आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी व घर काम करणाऱ्या महिलांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी (शहराध्यक्ष रा काँ यु पिं.चिं शहर) विशाल वाकडकर,(सरचिटणीस रा.यु.काँ.महा.प्र.जि.) विशाल काळभोर,(सरचिटणीस रा.काँ.पिं.चिं.) प्रतीक साळुंखे,(शहराध्यक्ष रा.काँ.पक्ष असंघटित कामगार विभाग पिं.चिं शहर)सोमनाथ कदम,(प्रभाग उपाध्यक्ष)रोहित साळवी,(महिला प्रभाग सरचिटणीस)सुरेखाताई फड, (महिला प्रभाग सरचिटणीस) शकुंतलाताई दहातोंडे,(महिला वॉर्ड अध्यक्ष)पूजाताई गरड,(महिला वॉर्ड सरचिटणीस)जयाताई वाघमारे,शामकांत नांगरे,सुनील राणे,(उपाध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिं शहर जिल्हा) प्रसाद कोलते,(सामाजिक कार्यकर्त्या)प्रिया कोलते, विवेक कोलते,अभिजीत कुरुंबनसी,ओंकार पवार,प्रतीक पाटील,आदित्य राठोड व प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन (उपाध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिं शहर जिल्हा) प्रसाद कोलते,(सामाजिक कार्यकर्त्या) प्रिया कोलते यांनी केले होते.