सोमवारी कोरोना चे १४२ नवीन रुग्णांची नोंद
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात आता नवीन कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे शासन वतीनेही अनेक निर्बंध घालण्यात आले होते ते आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत.पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी कोरोना चे १४२ नवीन रुग्ण संख्या नोंद झाली आहे त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत २६३६१३ जण कोरोना बाधित झाले आहे.
दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये दोन मनपा हद्दीमधील आहेत तर तीन मनपा हद्दीबाहेरील मयत आहेत त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आता पर्यंत कोरोना मुळे ४३३५ जण मयत झाले आहेत तसेच सोमवारी दिवसभरात १६३ जण कोरोना मुक्त झाले त्यानुसार आता पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात २५८२३९ कोरोना मुक्त झाले आहेत तरी शासन वतीने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे