शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन प्रियांका प्रविण बारसे (नगरसेविका पि.चि. मनपा) यांनी ७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्री वाटप करण्यात केले.
Advertisement
तसेच स्नेहछाया प्रकल्प दिघीतील वंचित,अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.मुलांशी संवाद साधुन आरोग्याविषयी काळजी घेण्यास सांगितले व आँनलाईन अभ्यास करण्यास सांगितले.लेखनाचा सराव ठेवावयास सांगुन डाळ-तांदूळ प्रकल्प अधिकारी दत्तात्रेय इंगळेसर व सौ. माई यांच्याकडे सौ. प्रियांका प्रविण बारसे नगरसेविका पिचीमनपा यांनी सुपुर्द केले.
Advertisement