शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील ४५ वर्षेवरील लसीकरण एकीकडे जवळपास पूर्ण होत असताना दुसरीकडे १८ ते ४५ वयोगटातीक नागरिकांना ऑनलाईन नोंदणीशिवाय लस दिली जात नाही. त्यामुळे निरक्षर व परप्रांतीय स्थानिक नागरिकांना ऑनलाईन नोंद करण्यास येत नाही. त्यामुळे बरेचसे नागरीक लसीकरणापासून वंचित असून तरी सदर लसीकरण पुर्णपणे टोकन पद्धतीने करण्यात यावे, जेने करून सर्व नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येईल असे निवेदन पिंपरी युवासेनेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके व पिंपरी युवा सेना युवती अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी दिले.
Advertisement