शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न साकार होत आहे या घराचा वापर योग्य प्रकारे करून आपले राहणीमान उंचवावे तसेच दिलेली सदनिका स्वच्छ व सुंदर ठेवून नागरिकांनी ते विकू नये असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत आज चिंचवड येथे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात महापौर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेविका जयश्री गावडे, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक शैलेश मोरे, माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप ,सामाजिक कार्यकर्ते दीपक मेवानी, , सुंदर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पात पाच इमारती उभारण्यात आलेले आहे त्यापैकी दोन इमारती साठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांची संगणकीय सोडत आज रोजी काढण्यात आलेली एक इमारतीमध्ये 112 सदनिका असून एका सदनिकेचे क्षेत्रफळ 269 चौरस फूट इतकी आहे. त्यापैकी एक सदनिका अंगणवाडी करिता राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी शासकीय नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून 42 हजार 770 मागासवर्गीयांसाठी व रुपये पन्नास हजार पाचशे पंच्याहत्तर खुल्या वर्गासाठी असून ज्यांची नावे पात्र लाभार्थ्यांमध्ये आहे त्यांच्याकडून स्वहिस्सा भरून घेऊन त्यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले. यामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा भरावा व सदनिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.
यावेळी नगर सदस्य जयश्री गावडे नगर सदस्य शितल शिंदे नगर सदस्य शैलेश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार नगर सदस्य शैलेश मोरे यांनी मानले