शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे त्या अंतर्गत आज चिंचवडगावात असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश भोईर यांच्या योगदान प्रतिष्ठान मार्फत मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
हि बातमी पण वाचा : Pimpri : ब कार्यालय अध्यक्ष पार्षद सुरेश भोईर का योगदान फाउंडेशन ने वरिष्ठ नागरिकों को बांटे नि:शुल्क छाते
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश भोईर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वलाताई गावडे, उपाध्यक्ष रंजना चिंचवडे, तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विविध पदाधिकारी व सुरेश भोईर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमांमध्ये चिंचवडगावातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले.
तसेच प्रभागातील भाजी विक्रेते हातगाडी चालक यांना पावसापासून संरक्षणासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे आयोजन योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्यावतीने करण्यात आले