शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान व जीवितहानी झाली आहे. या संकट काळात नुकसानग्रस्त व पूरग्रस्त भागात अनेक कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप पांढरकर यांनी आवाहन केले आहे कि पूरग्रस्तांच्या अडचणीला धावून जा आपल्यामुळे कुणालाही अडथळा होऊन देऊ नका कोरोना वाढता प्रभाव टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे यावेळी पालन करून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ज्या गावात मदत पोहोचण्यास अडथळा आहे अशा गावातील गरजू कुटुंबापर्यंत मदत पोचवण्यात यावी असे आदेश व आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हा व शहर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या आव्हानाच्या उपक्रमाला मानवतेच्या द्रुष्टीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सौजन्याने पूरग्रस्तांना सहाय्यता म्हणून जीवनावश्यक वस्तू मध्ये तांदूळ बिस्किट पाणी बाटली मेणबत्ती माचिस मीठ अशा वस्तू 300 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे असे नियोजन करून कोकणातील महाड तालुक्यातील चांबरखेड, कोळ, शिरगाव, धाडली, केबुर्ली, गोठे बुद्रुक या गावातील पूरग्रस्त व गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले.
सदरील मदत कार्यात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी अँड. मोहन आडसुळ, अँड. राजेंद्र काळभोर, श्री सुरेश लिंगायत, श्री शंकर पाटील, श्री गणेश साने, श्री राजीव पाटील, श्री सागर पांढरकर, श्री सयाजी जगताप, श्री रवींद्र पिंजण , सौ.शीतल तेली, सौ अर्चना कडू, सौ. प्राजक्ता पांढरकर, सौ केतकी देढसेना सौ रंजना बहिरट तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी योगदान दिले.
हि बातमी पण वाचा : नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सदरील उपक्रमाचे नियोजन युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन पांढरकर यांनी केले. यावेळी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ कृषी तंत्र विद्यालय तील पदाधिकारी व शिक्षक वर्गाने आम्हाला पूरग्रस्तांना त्यांच्या गावापर्यंत मदत पोचवण्या साठी मार्गदर्शन केले यावेळी महाड पोलादपूर विधानसभेचे माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन झाले आहे त्यांनाही पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली