शबनम न्यूज | चाकण
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नाणेकरवाडी गावच्या हद्दीत चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आलेल्या चोरट्याला पकडण्यात यश मिळवले असून, त्याच्याकडून अनेक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. या रेकॉर्डवरील अहमदनगरच्या सराईत गुन्हेगार असून पाच मोटरसायकली सह ताब्यात घेऊन जेरबंद केले. अशोक मधुकर सोनवणे (वय 41 रा. राळेगण थेरपाळ, अहमदनगर) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.
Advertisement
हि बातमी पण वाचा : Crime : दोघांना नोकरी लावण्याचे आमिषाने 21 लाखाची फसवणूक
अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 18 )आरोपी अशोक सोनवणे हा नाणेकरवाडी हद्दीत चोरीची मोटरसायकल विक्रीच्या उद्देशाने येणार आहे. ही माहिती पोलिसांना गोपनीय बातमी दारा मार्फत मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने नाणेकरवाडी हद्दीत बिके पार्क येथे सापळा रचला. सोनवणे नेमका आला असता त्याला पकडून मोटरसायकल बाबत चौकशी केली असता, त्यांनी सदर मोटरसायकल चोरीचे असल्याची कबुली दिली.