शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भाजपा शहाराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांच्या वतीने शिरोळ येथील पुरग्रस्तांना मदत वाटप करण्यात आली.
यावेळी संकेत चोंधे यांनी म्हंटले कि, भाजपा शहाराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील भाजपा नेते यांच्या उपस्थितीत आम्ही काल सकाळी मदत घेऊन निघालो होतो. साधारण १२ ते १ च्या दरम्यान कराड शहरात देवेंद्र फडणवीस साहेब व प्रवीण दरेकर साहेब यांच्या हस्ते गाड्यांना झेंडा दाखवुन आम्ही पुढे शिरोळकडे रवाना झालो. शिरोळ येथे पोहचल्यावर ती मदत तेथील सामाजिक प्रतिनिधी मार्फत शाळेवरती असणाऱ्या व गावातील काही भागात गरजुंना म्हणजेच पुरग्रस्तांना वाटप करण्यात आली.
हि बातमी पण वाचा : मी पुन्हा येईन म्हणणा-यांना उध्दव ठाकरे यांनी आडवे केले- रविंद्र मिर्लेकर
“आम्ही सर्व लोकांचे,संघाच्या स्वयंसेवकांचे व आमच्या सर्व पदाधिकारी वर्गाचे आभारी आहोत कि आपण या जनसेवेत आवर्जुन मिळुन सोबत उभे राहिलात. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना राहील कि देवाने आपदा ग्रस्तांना लवकर या संकटातुन बाहेर काढावे”, असे प्रतिपादन यावेळी संकेत सुरेश चोंधे यांनी केले आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांत पाटिल, उपध्याक्ष सुदर्शन पाटसकर, अनुप मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस गणेश जवळकर, तेजस्विनी कदम, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, स्वीकृत नगरसेवक संदिप नखाते, तेजस खेडकर, विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह, प्रथमेश सकपाळ, शुभांगी कसबे, आरती अभिजित, प्रकाश चौधरी, यश घाटे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.