शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विधानभवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना नियोजन करत प्राधान्याने दुसरा डोस देण्याच्या सूचना यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी केल्या.
हि बातमी पण वाचा : Pune : वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींना आरक्षण ; धोरण लकवाग्रस्त ठाकरे सरकारच्या अन्यायावर केंद्राचा दिलासा!
तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेऊन मनुष्यबळ वाढवा, औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेऊन कामगार विभागाशी चर्चा करुन कामगारांना वेळेत लसीकरण करण्यासाठी कक्ष स्थापन करा, कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.
तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देशही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यावेळी दिले.