शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील वूमन डेंटल कौन्सिलच्या राष्ट्रीय सचिव डॉक्टर मनीषा गरुड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला डी डी आय आरोग्य सन्मान हा राज्यस्तरीय जूरी आधारित अवॉर्ड समारोह नुकताच राजभवन महाराष्ट्र मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन होमिओपॅथी दंतवैद्यक शास्त्र आणि परिचारिका विभाग 80 नॉमनीस मधून 20 अंतिम निवडले गेले प्रत्येक विभागातून 4 जूरी नेमण्यात आले.
हि बातमी पण वाचा : Pimpri : सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
त्यापैकी एकच महिला वूमन डेंटल कौन्सिलच्या राष्ट्रीय सचिव डॉ. मनीषा गरुड यांची नेमणूक झाली ,. दंत विभागात चंद्रपूरचे डॉक्टर राजीव बोरले यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाण्याचे डॉ.अनिश नवरे यांना रफीउद्दीन अहमद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
डी डी आय चे पदाधिकारी डॉ. मनोज देशपांडे, डॉ.देवेंद्र हंबर्डेकर, डॉ. गिरीश कामत त्यांचे हे आरोग्य सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी सगळ्या पुरस्कार विजेते जुरी यांचा सन्मान केला तसेचआरोग्य सन्मान च्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.