शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौक येथे नव्याने ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलाचे काम झाले आहे मागील एक महिन्यापासून येथे वाहतुकीस सुरुवात करण्यात आली आहे परंतु या एक महिन्यात दोन अपघात होऊन आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे व सहा जण अपंग झाले. तरी याबाबत त्वरित कारवाई करून उड्डाणपूल वाहतुकीस सुरक्षित असावे याबाबतची कारवाई करावी व होणारे अपघात लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक मनपा गटनेते सचिन चिखले यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.
हि बातमी पण वाचा : २१७ कोरोना योध्यांना न्याय द्या , अन्यथा आंदोलनास सामोरे जा - यशवंत भोसले
सचिन चिखले यांनी म्हंटले आहे कि भक्ती-शक्ती चौकामध्ये आता नव्याने ग्रेड सेपरेटर – उड्डाणपुलाचे काम करण्यात आले व वाहतुक चालू करण्यात आली, पण आजही एका व्यक्तीचा अपघाती निधन झाले
मागील एक महिन्यापासून वाहतूक चालू करण्यात आली वाहतूक चालू झाल्यापासून अपघातामुळे आत्तापर्यंत तीन जण मृत्युमुखी, सहा जण अपंग झालेले आहेत अजूनही कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो
या पुलावर लवकरात लवकर आपली, वाहतूक पोलीस, पालिका अधिकारी वर्ग, यांची पाहणी व्हावी व त्या ठिकाणी उपाययोजना करावी
दर महत्वाच्या वळणावर व रोटरी पुलावर रर्मलर बसविण्यात यावे
योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक लावण्यात यावेत, एकेरी वाहतूक करत असताना नागरिकांना कळावे स्पष्ट फलक लावण्यात यावे ठिकाणी फलक लावण्यात यावे
ट्रान्सपोर्ट नगरी पासून येणाऱ्या रस्त्याजवळ योगिता स्पीड ब्रेकर लावून दिशादर्शक फलक लावण्यात यावे
यामुळे आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे राहिलेले काम पूर्ण करून घेण्यात यावे अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.