शबनम न्युज | पारनेर
अहमदनगर | प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे 16 वर्षीय चुलत बहिणींनी गुरुवारी दुपारी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची तब्येत देखील गंभीर आहे . एकतर्फी प्रेमातून झालेल्या छेडछाडीतून त्यांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हि बातमी पण वाचा - Pimpri : सफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन न्याय देण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी घ्यावी - कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे
दोन्ही बहिणी दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी दुपारी एक ते दोनच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना शिरूर तालुक्यातील एक एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यातील एकीचा मृत्यू झाला आणि दुसरीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सातत्याने परिसरातील मुलांकडून छेड काढली जात होती. त्याला वैतागून त्यांनी हा प्रकार केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे .
पोलिसांनी मुलीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी पडमने तपास करत आहेत. दुसरी मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पोलिस तिचा जबाब घेणार आहेत.सदर चुलत बहिणींची गेल्या चार महिन्यांपासून परिसरातील टारगट मुलांकडून छेड काढली जात होती त्याबद्दल त्या मुलांना समजही देण्यात आली होती, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पिंपळनेर येथील दोन जणांना ताब्यात घेतले आहेत हे दोघेही अठरा वर्षाचे आणि बारावी झालेले असल्याचे समजते.