जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे – नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चऱ्होली | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये चऱ्होली परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत दोन. ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वेताळ बुवा चौक , चऱ्होली येथे वैकुंठरथा चा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच साडेदहा वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपले रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे, प्रत्येक रक्तदात्यास एक सिस्का पावर बँक भेट म्हणून दिला जाणार आहे तसेच नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वैकुंठरथाचे लोकार्पण –
चऱ्होली परिसरात वैकुंठ रथाची आवश्यकता पाहता या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे यांच्या वतीने वैकुंठ रथाचे लोकार्पण २ ऑग. रोजी सकाळी १० वाजता करण्यात येत आहे यामुळे चऱ्होली परिसरातील नागरिकांना या वैकुंठ रथाची सोय उपलब्ध होणार असून होणाऱ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही.
वृक्षारोपण कार्यक्रम –
कोरोना महामारी काळामध्ये ऑक्सिजनची खरी गरज प्रत्येक माणसाला समजली आहे नैसर्गिक वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन मिळविण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्याने आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल व आरोग्य बाबतीत निर्माण होणाऱ्या समस्या होणार नाही याकरिता या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रक्तदान शिबिर –
सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा पूर परिस्थिती, कोरोना महामारी अशा प्रचंड संकटांचा सामना करीत आहे अशावेळी रुग्णालयांमध्ये रुग्णांना रक्ताचा पुरवठा अपुरा पडत आहे रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे यांनी केले आहे.
हि बातमी पण वाचा : २१७ कोविड योद्ध्यांना मिळाला न्याय; यशवंतभाऊ भोसले यांच्या मागणीला यश