एनआयपीएमच्या संशोधन ग्रंथ मालिकेतील चौथ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
शबनम न्यूज | पुणे : दिनांक ३१ जुलै २०२१ : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पुढाकाराने प्रकाशित करण्यात आलेले संशोधन ग्रंथ हा महत्वपूर्ण दस्तावेज असून औद्योगिक जगताच्या शाश्वत विकासासाठी हे संशोधन ग्रंथ मार्गदर्शक ठरतील असे मत एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
एनआयपीएम तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन ग्रंथ मालिकेतील चौथ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. हा चौथा संशोधन ग्रंथ ‘व्यवसायाच्या शाश्वत विकासात मनुष्यबळ व्यवस्थापकाच्या भविष्यकालीन भूमिकेसाठी च्या सुविधा‘ (FACILITATION FOR FUTURE ROLE OF HR IN BUSINESS SUSTAINABILITY) या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे.
या प्रसंगी बोलताना संशोधन ग्रंथाचे संपादक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे सांगितले की, चारही संशोधन ग्रंथांसाठी तज्ज्ञांचे सहकार्य लाभले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या चार संशोधन ग्रंथाना अनुक्रमे भारत फोर्ज उद्योग समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी, टेक महिंद्रा चे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एच. एल. गोखले व नेस्ले इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन अशा मान्यवरांची प्रस्तावना लाभली आहे.
तर या चारही संशोधन ग्रंथांसाठी एकूण २८६ शोधनिबंध प्राप्त झाले होते ज्यापैकी १७२ शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, केनिया व अमेरिका या देशांमधूनही काही शोधनिबंध प्राप्त झाले. हे चारही संशोधन ग्रंथ एनआयपीएमने सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. व्यवस्थापन शास्त्र शाखेतील एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या करिअरसाठी तर हे ग्रंथ म्हणजे उत्कृष्ट मार्गदर्शक ठरतील असा विश्वास डॉ. संतोष भावे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी संपादकीय समितीतील सदस्यांचे व एनआयपीएम पुणे विभागाच्या नवनियुक्त कार्यकारी समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
तसेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे व प्रा. डॉ. वंदना मोहांती यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच. डी. मार्गदर्शक (गाईड) म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएम पुणे चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तर आभारप्रदर्शन एनआयपीएम पुणेचे सचिव प्रकाश बिमलखेडकर यांनी केले.
कोविड नियमावलीच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
१)एनआयपीएमच्या संशोधन ग्रंथ मालिकेतील चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन करताना
डावीकडून संशोधन ग्रंथाचे संपादक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे,एनआयपीएम पुणे चे अध्यक्ष नरेंद्रपाटील,एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व एनआयपीएम पुणेचे सचिव प्रकाश बिमलखेडकर
२) एनआयपीएमच्या संशोधन ग्रंथ मालिकेतील चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी याप्रसंगी व्यासपीठावर बसलेलेडावीकडून संशोधन ग्रंथाचे संपादक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे,एनआयपीएम पुणे चे अध्यक्ष नरेंद्र पाटील व एनआयपीएम पुणेचे सचिव प्रकाश बिमलखेडकर
३) एनआयपीएमच्या संशोधन ग्रंथ मालिकेतील चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलताना संशोधन ग्रंथाचे संपादक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे व व्यासपीठावर बसलेले डावीकडून एनआयपीएम पुणे चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व एनआयपीएम पुणेचे सचिव प्रकाश बिमलखेडकर