शबनम न्यूज / मावळ
देहू / प्रतिनिधी
मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते निखिल चव्हाण यांचे नेतृत्वाखाली देहुगाव, चव्हाण नगर भाग 2 मधील एकता उसिंग सोसायटी मते ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम तत्परतेने पूर्ण झाले एका रात्रीत 13 तास थांबून युवानेते निखिल चव्हाण यांनी आपल्या नजरेसमोर सदरचे काम करून घेतले. एका रात्रीमध्ये संपूर्ण काम करून घेतल्याबद्दल नागरिकांनी निखिल चव्हाण यांचे यावेळी मनापासून आभार व्यक्त केले. निखिल चव्हाण यांना हिरो ची उपमा दिली
सदरचे कामाबाबत निखिल चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करीत आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले.
आमदार सुनिल अण्णा शेळके यांनीही सदरचे काम त्वरित करून देण्यासाठी शब्द दिला होता त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला याबद्दल त्यांचे धन्यवाद या शब्दात निखील चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या.