शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दिघी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात शिवसैनिक संतोष तानाजी वाळके यांच्यावतीने नागरिकांसाठी पंतप्रधान जनआरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मोफत मिळणार आहे या आयुष्यमान भारत कार्ड योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यभर पाच लाखाचा आरोग्य विमा मिळणार असून आयुष्यमान भारत कार्ड च्या माध्यमातून अनेक आरोग्य विषयी सुविधा उपलब्ध होणार आहेत याकरिता नागरिकांनी संतोष तानाजी वाळके यांचे जनसंपर्क कार्यालय, माऊली निवास ,विठ्ठल मंदिरा शेजारी, आळंदी रोड, दिघी येथे संपर्क साधण्याचे आवाहन संतोष तानाजी वाळके यांनी केले आहे.
तसेच दिघी परिसरातील नागरिकांनी, मतदानास पात्र असणाऱ्या व्यक्तींनी तरुण-तरुणी युवक-युवती यांनी आपले नाव मतदान यादीत नोंदवावे याकरिता मतदान नाव नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. मतदान यादी मध्ये नाव नोंदणी करण्याकरिता आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संतोष तानाजी वाळके यांचे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संतोष तानाजी वाळके यांनी केली आहे. दिघी परिसरातील नागरिकांना या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे संतोष तानाजी वाळके यांनी म्हटले आहे
हि बातमी पण वाचा – पुणे विभागातील 17 लाख 79 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 18 लाख 53 हजार 216 रुग्ण