शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील चिंचवडे नगर, शिवनगरी, वाल्हेकरवाडी,बिजलीनगर, दळवीनगर या उपनगरांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच वीज संदर्भात अनेक समस्या निर्माण होत असल्याने वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा याकरिता या भागातील नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे यांच्या वतीने शेखर चिंचवडे यांनी महावितरण विभागाला निवेदन दिले या निवेदनात त्यांनी नमूद केले की सध्या खंडित वीजपुरवठा, मोडकळीस आलेले डी पी बॉक्स, कमी क्षमतेच्या वीज वाहक केबल त्यामुळे येणारा अतिरिक्त ताण त्यामुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरे पडणारे ट्रान्सफॉर्मर या मुळे या परिसरात वारंवार नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पूर्वी हि बऱ्याच वेळा नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन पिंपरी डिव्हिजन व चिंचवड सब डिव्हिजन यांना दिले आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही तरी महावितरणने खालील मागण्यांचा तातडीने विचार करून या वर योग्य ती कार्यवाही करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे असे पिंपरी डिव्हिजन च्या वरिष्ठ अभियंता श्री. शिवाजी वायफळकर साहेब यांना भेटून मागणी चे निवेदन देण्यात आले.
सदरील प्रभागात चिंचवडेनगर, शिवनगरी, वाल्हेकरवाडी, दळवीनगर, बिजलीनगर या भागात कायम वीज पुरवठ्याशी निगडित समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते सलग ४-४ दिवस अंधारात राहावे लागते तरी याबाबत ठोस पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार बंद व्हावेत यासाठी उपलब्ध असलेल्या ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवावी याबाबत हि चर्चा या वेळी शेखर चिंचवडे यांनी केली
हि बातमी पण वाचा – दिघी परिसरात शिवसैनिक संतोष तानाजी वाळके यांच्यावतीने नागरिकांसाठी,मोफत आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी अभियान