शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कामांना वेग आला आहे. या प्रभागातील भाजप नगरसेविका स्वीनल कपिल म्हेत्रे व माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या माध्यमातून प्रभागात विकास कामे होत आहेत. प्रभागातील अनेक अडीअडचणी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर नगरसेविका स्वीनल म्हेत्रे या भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील साने कॉलनी, मनीषा हौसिंग सोसायटी, मोरे वस्ती येथे सुरू असलेल्या कलर ब्लॉक च्या कामाची पाहणी नगरसेविका स्वीनल म्हेत्रे व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी केली.
तसेच येथील ड्रेनेज लाईन ची कामे देखील तत्परतेने झाली आहे. या सर्व कामांची पाहणी सुरेश म्हेत्रे यांनी केली. प्रभागातील नागरिकांनी या कामाबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेविका स्वीनल म्हेत्रे व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांचे आभार व्यक्त केले.