शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नगरसेविका स्वाती माई काटे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 30 दापोडी, शितळादेवी चौक, गणेश नगर परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण व रस्ता विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन दापोडीतील समस्त जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभागातील रस्त्यांचे विकास कामाकरिता नगरसेविका स्वाती माई काटे यांनी वेळोवेळी मनपा अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांना निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दापोडी परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधील शितळादेवी चौक, गणेश नगर परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण व रस्ता विकास कामांचे भूमिपूजन दापोडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेवक रोहित आप्पा काटे, नगरसेवक राजूभाऊ बनसोडे, रा. यु. काँ. पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर भाऊ काटे आदी उपस्थित होते.