- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले निवडीचे पत्र
- पिंपरी-चिंचवड आजी- माजी शहराध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची महानगर प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
Advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून अमोल थोरात भाजपामध्ये कार्यरत आहेत. पक्ष संघटनासाठी त्यांनी योगदान दिले आहे. तसेच, जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल प्रदेश नेतृत्त्वाने घेतली आहे.
Advertisement
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमोल थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. तसेच, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांचे अभिनंदन केले आहे.
Advertisement