शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्र. 12 आणि १ रुपीनगर तळवडे येथे रहिवासी सोसायट्यांमध्ये अशोका झाड व इतर वृक्षाचे रोपण करण्याबाबत निवेदन गुलाब पुष्प उद्यान उद्यान निरिक्षक यांच्याकडे शिवसेनेचे रावसाहेब चंद्रकांत थोरात, नेताजी काशीद व संजय गाढवे यांच्या वतीने देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील नागरिक दरवर्षी वृक्ष कर भरतात. तरी आपले विभाग प्रभागात कुठले वृक्षाची लागवड करताना दिसत नाही. मग हा निधी कोठे जातो, तसेच पालिका उद्यानात झाडे आणावयास गेल्यास तेथे पैसे आकारले जातात. तरी आपल्या या विषयी इतर ठिकाणी वृक्षांची लागवड करत असलेले, परंतु ज्या प्रभागातून वृक्ष कर येतो त्या प्रभागात आपले विभाग वृक्ष याविषयी इतर ठिकाणी वृक्षांची लागवड करत असलेले, परंतु ज्या प्रभागातून वृक्ष कर येतो त्या प्रभागात आपले विभाग वृक्ष लागवड करताना दिसत नाही, म्हणून नियोजनबद्ध व ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 आणि १ मधील सोसायटीमध्ये जागा उपलब्ध असेल, तर रस्त्याला अडथळा होणार नाही व नागरिकांची हरकत नसेल. त्या सर्व ठिकाणी सोसायट्यांमध्ये आपल्या विभागाने अशोक वृक्षाचे व इतर वृक्षाचे रोपण करावे व त्याचा अहवाल दोन महिन्यात आम्हाला सादर करावा, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. यावेळी रावसाहेब चंद्रकांत थोरात, नेताजी काशीद, संजय गाढवे, दादा नरळे आदी मान्यवर उपस्थित होते.